भारताचे डिजिटल पेमेंट इंटरफेस युपीआयचा नवा विक्रम
मुंबई चौफेर टेक । ३ जानेवारी २०२३ ।युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे झालेले पेमेंट डिसेंबरमध्ये 12.82 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले. 2016 मध्ये लाँच झालेल्या या प्लॅटफॉर्मवर डिसेंबरमध्ये व्हॉल्यूमच्या दृष्टीने 782 कोटी व्यवहार झाले.
‘यूपीआयने देशात डिजिटल पेमेंट क्रांती आणण्यात मोठे योगदान दिले आहे. डिसेंबर 2022 मध्ये, युपीआयने 12.82 ट्रिलियनचे 7.82 अब्ज व्यवहार पार केले आहेत.’ असे वित्तीय सेवा विभागाने सोमवारी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.
या वर्षी ऑक्टोबरमध्ये युपीआय द्वारे पेमेंटने 12 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता. नोव्हेंबरमध्ये, यूपीआयद्वारे 11.90 लाख कोटी रुपयांचे तब्बल 730.9 कोटी व्यवहार झाले. युपीआय ही झटपट रिअल-टाइम पेमेंट सिस्टम आहे, जी इंटर-बँक पीअर-टू-पीअर (P2P) व्यवहार सुलभ करते. यामुळे मोबाईलद्वारे सोप्या पद्धतीने व्यवहार होतात. युपीआय व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क लागू नाही.