कॉल ड्रॉप आणि स्लो इंटरनेट डेटा स्पीडबाबत सरकारकडून हालचाली
मुंबई चौफेर टेक I २६ डिसेंबर २०२२ I कॉल ड्रॉप आणि स्लो इंटरनेट डेटा स्पीडबाबत सरकार मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेलिकॉम डिपार्टमेंट यावर कारवाई करणार आहे.
सरकार लवकरच टेलिकॉम कंपन्यांना सेवेची क्वालिटी सुधारण्याच्या सूचना देणार आहे. यासाठी टेलिकॉम सचिवांनी 28 डिसेंबरला टेलिकॉम कंपन्यांसोबत बैठकही बोलावली आहे. या बैठकीत यासंदर्भात मोठा निर्णय घेतला जाणार आहे. अनेकदा युजर्स मध्येच कॉल डिस्कनेक्ट झाल्याची तक्रार करतात. याशिवाय, इंटरनेटचा स्लो स्पीड युजर्सचा मूड खराब होतो. युजर्सची ही समस्या सोडवण्यासाठी टेलिकॉम डिपार्टमेंट अॅक्टिव्ह मोडमध्ये आले आहे. त्यामुळे येत्या काळात या समस्येतून सुटका करण्यासाठी सरकार नवीन नियम जारी करू शकते.