AI बॉटचा इंटरनेटवर धुमाकूळ
मुंबई चौफेर टेक I ७ डिसेंबर २०२२ I ChatGPT म्हणून ओळखल्या जाणार्या AI बॉटने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे पण ते नेमके काय आहे आणि ते कसं काम करत ? ChatGPT हा एक नवीन AI चॅटबॉट आहे जो तुमच्या कोडमधील चुका शोधू शकतो किंवा तुमच्यासाठी कथा सुद्धा लिहू शकतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मध्ये गेल्या काही वर्षांमध्ये खूप सुधारणा झाली आहे आणि एक गोष्ट जी प्रचंड मोठी बनली आहे ती म्हणजे जनरेटिव्ह AI, जी तुम्ही इनपुट केलेला डेटा वापरते जसे की मजकूर आणि फोटो आणि त्याचा वापर करून तुम्हाला अधिक आउटपुट देते.
OpenAI या कंपनीची स्थापना एलोन मस्क आणि सॅम अल्टमन यांनी केली होती नंतर मस्क यांनी राजीनामा दिला, पण आर्थिक गुंतवणूक कायम ठेवली. ChatGPT नक्की काय आहे ? OpenAI, या AI कंपनीने ChatGPT, कंपनीच्या नवीन GPT-3.5 नैसर्गिक भाषा निर्मिती तंत्रज्ञानावर आधारित चॅटबॉटची घोषणा केली आणि ते ३० नोव्हेंबरला लोकांसाठी रिलीज केलं. ओपनएआयने (OpenAI) ने यापूर्वी DALL-E (डॅल-ई) सादर केले होते, हे एक AI इमेज जनरेटर आहे जो तुम्हाला पाहिजे तशी इमेज तयार करून देतो. ChatGPT हे एक संभाषणात्मक संवाद मॉडेल आहे, जे नैसर्गिक मानवी भाषा समजून घेण्यासाठी आणि प्रतिसाद देण्यासाठी AI आणि मशीन लर्निंगद्वारे काम करत त्याचे नाव GPT किंवा जनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर वरून पडलं आहे , ते आपला मेंदू ज्याप्रमाणे शिकतो त्याचप्रमाणे हे AI चॅटबॉट शिकण्याचा प्रयत्न करत, आणि इंटरनेटवर उपलब्ध असलेला मजकूर आणि साहित्य वाचून आणि मुख्य म्हणजे तो मजकूर समजून घेऊन तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतं.
हे चॅटबॉट तुम्ही भूतकाळात विचारलेले प्रश्न लक्षात ठेवतं आणि जर तुम्ही एखादी त्याने एखादी केलेली चूक दाखवली तर त्यामध्ये स्वतः सुधार करत आणि वापरकर्त्यांच्या चुकीच्या विनंत्या नाकारण्याचं काम सुद्धा करत. ChatGPT कसे कार्य करते? ओपनएआयने (OpenAI) रिइन्फोर्समेंट लर्निंग फ्रॉम ह्यूमन फीडबॅक (RLHF) म्हणून ओळखल्या जाणार्या प्रशिक्षण पद्धतीचा वापर करून ChatGPT प्रशिक्षित केले. RLHF AI ला प्रशिक्षित करण्यासाठी पुरस्कार/शिक्षा प्रणाली वापरते. डीप लर्निंग ही एक मशीन लर्निंग पद्धत आहे ज्यामध्ये न्यूरल नेटवर्कचे तीन किंवा अधिक स्तर असतात.