देशभरात ‘या’ दिवसापासून सुरू होणार बीएसएनल 5G सेवा
मुंबई चौफेर टेक I ९ डिसेंबर २०२२ I भारतातील काही ठिकाणी 5G सेवा (5G Service) सुरू झाली आहे. 2023 पर्यंत, रिलायन्स जिओ आणि एअरटेलद्वारे (Reliance Jio and Airtel) 5G सेवा देशभरात आणली जाईल.
कंपन्यांचे म्हणणे आहे की 5G चा रिचार्ज प्लॅन 4G इतकाच असेल. यासाठी ग्राहकांना जास्त खर्च करावा लागणार नाही. दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव ) यांनी सांगितलं आहे की, BSNL लवकरच 5G सेवा देखील आणणार आहे. ते अपग्रेड करण्यासाठी किमान 5 ते 7 महिने लागू शकतात. देशभरात लाखो टॉवरसह 5G सेवा सुरू केली जाईल.
CII च्या एका कार्यक्रमात मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, दूरसंचार तंत्रज्ञान विकास निधी दरवर्षी 500 कोटींवरून 4,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवून नवीन स्टार्टअप्सना प्रोत्साहन दिले जाईल. पीटीआयच्या वृत्तानुसार, अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, बीएसएनएलचे 4जी तंत्रज्ञान 5 ते 7 महिन्यांत 1.35 लाख टेलिकॉम टॉवर्सवर 5G मध्ये आणले जाईल.भारतातील दुर्गम भागात 5G सेवा BSNL द्वारे प्रदान केली जाईल. यामुळे लोकांच्या नेटवर्कशी संबंधित समस्या दूर होतील. वैष्णव म्हणाले की, तंत्रज्ञान विकास निधीसाठी दरवर्षी 500 कोटी रुपयांचे बजेट आणले जाते, मात्र आता ते 3 हजारांवरून 4 हजार कोटींवर नेण्याची योजना आखली जात आहे.स्टार्टअप्सचा संदर्भ देताना अश्विनी वैष्णव म्हणाले की, रेल्वे अंतर्गत 800 स्टार्टअप आणि संरक्षण क्षेत्रांतर्गत 200 स्टार्टअप कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत.