आयसीएमआर वेबसाइटवर सायबर हल्ले; 24 तासांत 6000 वेळा हॅक करण्याचा प्रयत्न
मुंबई चौफेर टेक I ७ डिसेंबर २०२२ I इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (ICMR) च्या वेबसाइटवर सायबर हल्ला (Cyber Attacks) झाल्याची बातमी आहे. हॅकर्सनी एकाच दिवसात सुमारे सहा हजार वेळा सायबर हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे.
30 नोव्हेंबर रोजी सायबर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता. देशात सातत्याने सायबर हल्ल्याची प्रकरणे समोर येत आहेत. अलीकडेच दिल्ली एम्सच्या सर्व्हरवरही सायबर हल्ला झाला होता. सर्व्हर डाउन टाइममुळे अनेक दिवस सर्व कामे मॅन्युअली होत होती.
अहवालानुसार, आयसीएमआर वेबसाइटवर हाँगकाँग स्थित ब्लॅकलिस्टेड IP पत्त्याद्वारे हल्ला करण्यात आला. आयसीएमआरच्या सर्व्हरच्या फायरवॉलमध्ये कोणतीही सुरक्षा त्रुटी नव्हती, ज्यामुळे हॅकर्स रुग्णाच्या माहितीमध्ये प्रवेश करू शकले नाहीत. एअनआयने दिलेल्या माहितीनुसार, आयसीएमआरची वेबसाईट सुरक्षित आहे. एनआयसीला मेलद्वारे सायबर हल्ल्याची माहिती देण्यात आली होत आणि त्यांच्याकडून रिपोर्ट आला आहे की, हा हल्ला रोखण्यात यश आले आहे.