Twitter ने खरोखरच हटवले Suicide Prevention Feature?
मुंबई चौफेर टेक I २६ डिसेंबर २०२२ I मायक्रो ब्वॉगिंग साईट ट्विटरवर असलेले सुसाइड प्रिवेंशन फीचर हटविण्यात आल्याची जोरदार चर्चा होती. याबाबत एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तावर ट्विटरचे सीईओ एलन मस्क यांनी प्रतिसाद दिला आहे.
या प्रतिसादात अशा प्रकारचे कोणतेची फीचर हटविण्यात आले नाही. ते फीचर अद्यापही सक्रीय असल्याची माहिती मस्क यांनी दिली आहे. त्यांनी याबाबत ट्विटरही केले आहे.
वृत्तसंस्थेने आपल्या वृत्तात 2 युजर्सच्या हवाल्याने म्हटले होते की, मस्क यांनी ट्विटरवरील सुसाईड प्रवेंन्शन फीचर हटविण्याचे आदेश दिले आहेत. ज्या फीचरद्वारे आत्महत्या करणाऱ्याचा विचार करणाऱ्या लोकांची मदत केली जाते. कोणत्याही प्रकारची पोस्ट, व्हिडिओ किंवा फोटो अथवा इतर कोणताही आशय जर आत्महत्या करण्याशी संबंधीत असल्याचे आढळून आले तर सुसाइड प्रिवेंशन फीचर हा विचार बदलण्यास तातडीने मदत करते. जेणेकरुन संबंधीत व्यक्ती अथवा युजर आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त व्हावा.
माइक्रोब्लॉगिंग प्लेटफॉर्म हॉटलाइन आत्महत्या रोखण्यासाठी सुरक्षेशी संबंधीत इतरही अनेक गोष्टी उपलब्ध करुन देते. दरम्यान, वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले होते की, हे फीचर काढून टाकण्यापूर्वी ट्विटरने कोणतीही माहिती शेअर केली नव्हती. युजर्स #ThereIsHelp द्वारे या फीचरची मदत घेतात. या वैशिष्ट्याने मानसिक आरोग्य, HIV, लस, बाल शोषण, Covid-19, लिंग-आधारित हिंसा, नैसर्गिक आपत्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या जगभरातील अनेक घटकांना पाठबळ दिले आहे.
दरम्यान, वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले होते की, हे फीचर काढून टाकण्यापूर्वी ट्विटरने कोणतीही माहिती शेअर केली नव्हती. युजर्स #ThereIsHelp द्वारे या फीचरची मदत घेतात.