पैसे वाचवण्यासाठी Elon Musk यांचा नवा फंडा
मुंबई चौफेर टेक ।३१ डिसेंबर २०२२ । एलॉन मस्क ने कंपनीच्या रखवालदाराला कामावरून काढून टाकल्यानंतर ट्विटर कर्मचार्यांना त्यांचे स्वतःचे टॉयलेट पेपर ऑफिसमध्ये आणावे लागत आहेत, असे एका अहवालात म्हटले आहे.
एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या न्यूयॉर्क कार्यालयातील सफाई कर्मचार्यांना कामावरून काढले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला सॅन फ्रान्सिस्को मुख्यालयातील स्वच्छता सेवा रद्द करण्यात आली आहे.
एलॉन मस्क यांनी कंपनीने सॅन फ्रान्सिस्को कार्यालयात चार मजले बंद केले आहेत. तसेच सर्व कर्मचारी दोन मजल्यांवर हलवले आहेत. पैसे वाचवण्यासाठी मस्क यांनी हा निर्णय घेतला. द न्यूयॉर्क टाइम्सच्या मते, माजी कर्मचार्यांच्या म्हणण्यानुसार, “लोक अधिक बंदिस्त जागेत पॅक केल्यामुळे, उरलेल्या अन्नपदार्थाचा वास आणि शरीराचा गंध मजल्यांवर रेंगाळत आहे.