युवा संशोधकांसाठी ‘डॉ. कलाम यंग रिसर्च फेलोशिप’

मुंबई चौफेर टेक । ३ जानेवारी २०२३ ।‘तेर पोलिसी सेंटर’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील ‘डॉ. ए. पी. जे. कलाम यंग रिसर्च फेलोशिप’साठी अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे.

युवा संशोधकांना येत्या 31 जानेवारी पर्यंत या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे,अशी माहिती संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. विनिता आपटे यांनी पत्रकाद्वारे दिली.

डॉ. अब्दुल कलाम यांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी व युवकांच्या कल्पकतेला वाव देत तरुण, नवोदित संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘डॉ. ए. पी. जे. कलाम यंग रिसर्च फेलोशिप’सुरु करण्यात आली असून यंदा शिष्यवृत्तीचे 6 वे वर्ष आहे. यातील सर्वोत्कृष्ट 5 विद्यार्थ्यांना प्रत्येकी रुपये 25 हजार व प्रमाणपत्र अशी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. शिष्यवृत्तीविषयी अधिक माहिती व अर्ज भरण्यासाठी https://www.drkalamfellowship.com/ या संकेतस्थळाला भेट द्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे . या शिष्यवृत्तीसाठी वय वर्ष 18 ते 25 या वयोगटातील युवक अर्ज भरू शकतात.