कोणतीही परीक्षा न देता ‘या’ सरकारी बँकेत मिळेल नोकरी!
मुंबई चौफेर टेक I २६ डिसेंबर २०२२ I स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती सुरु आहे. येत्या वर्षात तुम्हाला बॅंकेत नोकरीची संधी मिळणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये एकूण १४३८ पदांसाठी भरती केली जाणार आहे. कलेक्शन फॅसिलेटरची एकूण ९४० तर रिटायर्ड क्लरिकल स्टाफची ४९८ रिक्त पदे भरले जाणार आहे. शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. सेवानिवृत्त बॅंक अधिकारी/कर्मचारी या रिक्त पदांसाठी अर्ज करु शकतात.
कलेक्शन फॅसिलिटर कलेक्टर या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २५ हजार रुपये पगार दिला जाणार आहे. जेएमजीएस पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३५ हजार रुपये पगार दिला जाणार आहे. तर एमएमजीएस-II, एमएमजीएस-III पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ४० हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.
२२ डिसेंबर २०२२ पासून याची अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना १० जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. तसेच अधिक माहितीसाठी बँकेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी