गेराल्ड जे लॉसन यांचे गूगल डूडल

मुंबई चौफेर टेक I १ डिसेंबर २०२२ I गेराल्ड जे लॉसन (Gerald Jerry Lawson), व्हिडिओ गेमचे प्रणेते. गूगल डूडल (Google Doodle) आज साजरा करतंय त्यांचा 82 वा वाढदिवस. गेराल्ड जे लॉसन हे असे एक व्यक्तिमत्व आहे.

ज्यांनी पहिली होम व्हिडिओ गेमिंग प्रणाली विकसित करणाऱ्या टीमचे नेतृत्व केले. आजचे गूगल डूडल गेराल्ड जे लॉसन (Gerald Jerry Google Doodle) यांनाच अर्पण केले आहे. आजच्या गूगल डूडलचे डिजाईन डेव्हियन गुडेन (Davionne Gooden), लॉरेन ब्राउन (Lauren Brown) आणि मोमो पिक्सेल (Momo Pixel) यांनी डिझाइन केले आहे.

गेराल्ड जे लॉसन यांचा जन्म न्यू यॉर्कमधील ब्रुकलीन येथे 1 डिसेंबर 1940 मध्ये झाला. लहानपणापासूनच त्यांना इलेक्ट्रिक उपकरणांबाबत विशेष रुची होती. त्यामुळेच ते इलेक्ट्रिक वस्तू पाहिली की त्यासोबत अनेक उठाठेवी करत. जसे की ती वस्तू खोलने, त्याचे कार्य तपासणे, त्या पुन्हा जोडणे आदी. विशेष म्हणजे लहानपणीच ते आपल्या शेजाऱ्यांचे रेडीओ, टीव्ही दुरुस्ती करणे. त्यातील बिघाड दूर करणे असे उद्योगकरायचे. उल्लेखनीय बाब म्हणजे बिघडलेल्या वस्तू जमा करुन त्यांनी लहानपणी आपले स्वत:चेच एक रेडिओ स्टेशन सुरु केले. (