डिजिटल रुपी अँपचा वापर किती सुरक्षित आहे, जाणून घ्या
मुंबई चौफेर टेक I ३ डिसेंबर २०२२ I भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने डिजिटल रुपी ई-रुपी लाँच केले आहे. किरकोळ डिजिटल चलनाचा जो पहिला पायलट प्रोजेक्ट आहे.
डिजिटल रुपी लॉन्च होताच लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की अॅपवरून डिजिटल रुपी वापरणे सुरक्षित आहे का? जर तुमच्याही मनात असा काही प्रश्न असेल तर तज्ज्ञांचं यावर काय म्हणणं आहे ते जाणून घ्या.
1 डिसेंबरपासून देशातील चार शहरांमध्ये ई-रुपी ची चाचणी सुरू झाली आहे. किरकोळ ई-रुपी चाचणीसाठी पहिल्या टप्प्यात, मुंबई, नवी दिल्ली, बेंगळुरू आणि भुवनेश्वर या चार शहरांमध्ये जारी करण्यात आले आहेत. या चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी 9 शहरे जोडली जाणार आहेत. पहिल्या चाचणीसाठी SBI, ICICI, येस बँक आणि IDFC बँक यांची निवड करण्यात आली आहे.