२० कोटींपेंक्षा अधिक ट्विटर युझर्सचे मेल आयडी लीक

मुंबई चौफेर टेक । ६ जानेवारी २०२३ । साधारण २० कोटींपेंक्षा अधिक ट्विटर युझर्सचे मेल आयडी लीक झाल्याचा दावा करण्यात येत आहे. याबाबत इस्रायली सायबर सिक्युरिटी मॉनिटरिंग फर्म हडसन रॉकचे सहसंस्थापक अलॉन गल यांनी लिंक्डइनवर माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून ट्विटर (Twitter) वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. मात्र आता ट्विटर युजर्सची चिंता वाढवणारी माहिती समोर येत आहे. साधारण २० कोटींपेक्षा(More Than 200 Million Twitter Users Email ID LEaked) अधिक ट्विटर युजर्सचे इमेल आयडी लीक झाले आहेत. ते इमेल आयडी एका ऑनलाईन हॅकिंग फोरमवर पब्लिश करण्यात आल्याचा दावा एका सिक्युरिटी रिसर्चरने केला आहे. मात्र या दाव्यावर ट्विटरने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.