2023 मध्ये ‘या’ गोष्टी कधीही इंटरनेटवर सर्च करू नका
मुंबई चौफेर टेक । ३ जानेवारी २०२३ ।इथूनपुढे तुम्हाला सर्व काही गुगलवर सर्च करता येणार नाही. अशा काही गोष्टी आहे कदाचित ज्या तुम्ही गुगलवर सर्च केल्यास तुम्हाला ते महागात पडू शकते. म्हणजेच तुम्हाला तुरुंगातही जावे लागू शकते. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो की, अशा कोणत्या गोष्टी गुगलवर सर्च करणे टाळावे.
बॉम्ब कसा बनवावा?
अगदी गम्मत म्हणूनही कधी गुगलवर बॉम्ब कसा बनवायचा? हे सर्च करू नका. असे केल्यास तुम्ही सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर येऊ शकता. तुम्ही गुगलवर असा सर्च केल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते आणि तुम्ही अडचणीत येऊ शकता.
बाल अश्लील कंटेंट
जर तुम्ही गुगलवर चाइल्ड पोर्नोग्राफीशी संबंधित गोष्टी सर्च केल्या तर तुमचा आयपी पत्ता ओळखून तुम्हाला तुरुंगातही टाकले जाऊ शकते. चाइल्ड पॉर्न बनवणे किंवा ते डाउनलोड करून पाहणे हे दोन्ही बेकायदेशीर आहे. त्यामुळे त्या संबंधित गोष्टी अजिबात गुगलवर सर्च करू नका. हा खूप संवेदनशील विषय असल्याने त्याबाबत पोलीस तुम्हाला तुरुंगात टाकू शकतात.
कोणताही गुन्हा करण्याविषयी शोध-
कोणताही गुन्हा करण्याविषयी शोध लोकांसाठी गंभीर समस्या निर्माण करू शकतो. कारण कोणीतरी गुन्हा करण्याची योजना आखत असेल तर सुरक्षा यंत्रणांना त्याची माहिती मिळेल व त्यामुळे तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकेल. म्हणजेच, एखाद्याचा खून कसा करायचा?, विष कसे बनवायचे? किंवा संशय न येता गुन्हा कसा करायचा? इत्यादी सर्चमुळे पोलीस तुमच्या दारात येतील. विशेषत: खून, अपहरण, ड्रग्ज किंवा तस्करी संबंधित विषयांबाबत वारंवार सर्च केल्यास तुमच्यासाठी नक्कीच गंभीर संकट उभे राहील.