आता WhatsApp वर तयार करू शकता 3D Avatar

मुंबई चौफेर टेक I ९ डिसेंबर २०२२ I मेटा संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी बुधवारी घोषणा केली की कंपनी व्हॉट्सअॅपवर डिजिटल अवतार आणत आहे. व्हॉट्सअॅपवर, लोक आता त्यांचे वैयक्तिक अवतार प्रोफाईल फोटो म्हणून वापरू शकतात किंवा विविध भावना आणि क्रिया असणार्या ३६ सानुकूल स्टिकर्सपैकी एक निवडू शकतात.

“आम्ही WhatsApp वर अवतार आणत आहोत!आता तुम्ही तुमचा अवतार चॅटमध्ये स्टिकर म्हणून वापरू शकता. आमच्या सर्व अॅप्सवर लवकरच आणखी अपडेट येत आहेत,” असे झुकरबर्ग यांनी सांगितले आहे.

तुमचा हुबेहूब अवतार तुम्ही स्वतः तयार करू शकता.” स्वतःचा अवतार पाठवणे एक जलद आणि मजेशीर मार्ग आहे. तुमचा खरा फोटो न वापरता स्वतःचे अवतार तुम्ही वापरू शकता,” असे WhatsApp ने म्हटले आहे.कंपनीने सांगितले की, तुम्ही तुमच्या अवतारचा लूक बदलू शकता. झुकेरबर्ग यांनी सांगितले आहे की, “नवीन अपडेट लवकरच अधिक देशांमध्ये आणण्यासाठी उत्सुक आहे”.

खालील स्टेप्स फॉलो करून तयार करा स्वतःचा अवतार, पाहा

1: तुमच्या Android फोनवर WhatsApp उघडा.

2: वरच्या-उजव्या कोपर्यात असलेल्या तीन-बिंदू म्हणजेच मेनूवर टॅप करा आणि सेटिंग्ज उघडा.

3: ‘अवतार’ हा पर्याय निवडा.

4: ‘तुमचा अवतार तयार करा’ वर टॅप करा.

5: आता तुम्हाला पाहिजे तसा अवतार तुम्ही बनवू शकता.

6 : तुम्हाला पाहिजे तसा अवतार बनवल्यानंतर Done वर क्लिक करा.