OnePlus 11 5G हा दमदार स्मार्टफोन घेऊन येणार अनेक फीचर्स
मुंबई चौफेर टेक । ४ जानेवारी २०२३ । OnePlus 11 5G सह वायरलेस चार्जिंग समर्थित नाही. याला वॉटर रेझिस्टन्ससाठी IP68 रेटिंग मिळाली आहे. फोनमध्ये 100W वायर चार्जिंगला सपोर्ट असलेली 5000mAh बॅटरी आहे. OnePlus 11 ची सुरुवातीची किंमत म्हणजे 12 GB रॅम सह 256 GB स्टोरेज 3,999 चीनी युआन म्हणजे सुमारे 48,098 रुपये आहे. त्याच वेळी, Buds Pro 2 ची किंमत 899 युआन म्हणजे सुमारे 10,812 रुपये आहे.
OnePlus Buds 2 Pro बद्दल बोलायचे झाले तर ते Dynaudio आणि MelodyBost च्या मिश्रणातून डिझाइन केले गेले आहे. यात ड्युअल ड्रायव्हर आहे. स्टिरीओ ग्रेड ऑडिओसोबत उपलब्ध असेल. OnePlus Buds 2 Pro मध्ये 11mm आणि 6mm चे दोन ड्रायव्हर्स आहेत. यात क्रिस्टल पॉलिमर डायफ्रोम आहे. याशिवाय OnePlus Buds 2 Pro मध्ये सक्रिय नॉइज कॅन्सलेशन देखील आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.3 LE आहे. OnePlus Buds 2 Pro च्या बॅटरीबाबत 39 तासांच्या बॅकअपचा दावा आहे.