सॅमसंगचा Galaxy M04 फोन भारतात लॉन्च
मुंबई चौफेर टेक ।३१ डिसेंबर २०२२ ।सॅमसंगने आपला Galaxy M04 फोन भारतात लॉन्च केला आहे. सॅमसंग गॅलॅक्सी M04 ला वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले मिळेल. याशिवाय 8 जीबी रॅम उपलब्ध असेल. फोनची किंमत 8,499 रुपयांपासून सुरू होते. हा मोबाईल 16 डिसेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.
फोटोग्राफीसाठी, Galaxy M04 मध्ये 13 मेगापिक्सेल आणि 2 मेगापिक्सेलचे दोन रियर कॅमेरे आहेत, जे LED फ्लॅशसह येतात. त्याचबरोबर फोनमध्ये 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. कंपनीने हा फोन मिंट ग्रीन, गोल्ड, व्हाईट आणि ब्लू कलर ऑप्शनमध्ये सादर केला आहे.