Samsungचा तगडा स्मार्टफोन लवकरच होणार लाँच

मुंबई चौफेर टेक । १ जानेवारी २०२३ । येत्या वर्षात अनेक मोठे ब्रँड्स त्यांचे बहुप्रतिक्षित फोन लाँच करणार आहेत. याची सुरुवात जानेवारीपासून होणार आहे. यामध्ये अगदी महागड्या फोनपासून ते स्वस्तातल्या फोनचाही समावेश आहे.
तुम्हाला सॅमसंग कंपनीचे फोन आवडत असतील, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सॅमसंग लवकरच आपला नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy F04 लाँच करणार आहे. ब्रँडचा हा फोन म्हणजे एंट्री लेव्हल डिव्हाइस असेल. कंपनी जानेवारीच्या सुरुवातीलाच हा हँडसेट लाँच करू शकते.

हा फोन सॅमसंगच्या एफ-सिरीजचा भाग असेल आणि तो एक्सक्लुसिव्ह फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल. कंपनीने या हँडसेटला लाँच करण्याची तयारी सुरू केली आहे. लाँच होण्यापूर्वी या सॅमसंग हँडसेटची किंमत आणि इतर स्पेसिफिकेशन्स लीक झाली आहेत. फोन ड्युएल रिअर कॅमेरा सेटअप आणि 8GB RAM सह येऊ शकतो, असं म्हटलं जातंय