RBI कडून सिंगल ब्लॉक मल्टिपल डेबीट्स सुविधा
मुंबई चौफेर टेक I ८ डिसेंबर २०२२ I भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) पेमेंट सेवा आणखी सुधारण्यासाठी ‘सिंगल ब्लॉक’ (Single Block) आणि ‘मल्टिपल डेबिट’ (Multiple Debits) सुविधा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
या सुविधेअंतर्गत, ग्राहक एखाद्या व्यापाऱ्यासाठी त्याच्या बँक खात्यात निश्चित रक्कम ब्लॉक करू शकतो. सेवा पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम ग्राहकाच्या खात्यातून आपोआप कापली जाईल. ब्लॉक रक्कम म्हणजे ग्राहकाच्या खात्यातील शिल्लक रकमेचा तो भाग, जो त्याला विशिष्ट हेतूसाठी राखून ठेवायचा आहे किंवा ब्लॉक करायचा आहे.
चलनविषयक धोरणाच्या आढाव्याबद्दल माहिती देताना, आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, UPI ची क्षमता वाढवून, ग्राहकांना सेवांच्या पेमेंटसाठी त्यांच्या खात्यातील रक्कम ‘ब्लॉक’ करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे, ई-कॉमर्स आणि सिक्युरिटीजमधील गुंतवणुकीसाठी पेमेंट करणे सोपे होईल.