एअरटेल,जिओ ,व्होडाफोन आयडियाची SMS सेवा राहणार 24 तास बंद
मुंबई चौफेर टेक I १ डिसेंबर २०२२ I दूरसंचार विभाकडून कडून नवा नियम जारी करण्यात आला आहे. यामध्ये दूर संचार विभागाने Reliance Jio, Airtel and Vodafone-Idea या दूरसंचार कंपन्यांना SIM एक्स्चेंज किंवा अपडेटेशन मध्ये 24 तासांसाठी एसएमएस सेवा (इन्कमिंग आऊटगोईंग) बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
नव्या सीमच्या अॅक्टिवेशन नंतर आता 24 तास सीम बंद असणार आहे. रिपोर्ट्सनुसार, नवीन सिम किंवा अपग्रेडसाठी विनंती केली गेली आहे किंवा नाही हे सिम सक्रिय झाल्यानंतर 24 तासांच्या आत पडताळून पाहिलं जाईल.
सध्या ग्राहकांची वैयक्तिक माहिती चोरणे खूप सोपे झाले आहे. याच्या मदतीने फसवणूक करणाऱ्यांना नवीन सिम दिले जाते, त्यानंतर ग्राहकाच्या नकळत जुने सिम बंद केले जाते. त्याच नवीन सिममधून ओटीपी मिळवून बँकिंग फसवणुकीच्या घटना घडतात. पण आता नव्या नियमामुळे त्याला चाप बसणार आहे.
देशात डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. यासोबतच डिजिटल बँकिंग फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे.सिम स्वॅपिंगच्या माध्यमातून बँकिंगची मोठी फसवणूक झाल्याचे अनेकदा आढळून आले आहे.