पाच वर्षात डिजिटल जाहिरातींवर $21 अब्जांपर्यत खर्च होणार

मुंबई चौफेर टेक I २७ डिसेंबर २०२२ I देशभरात स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर एवढा वाढला आहे की त्याचा एक विक्रमचं भारतीयांनी केला असं म्हणायला हरकत नाही. सध्या अगदी लहानग्यांपासून ते आजोबा-आजी पर्यत प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे.

त्यामुळे देशभरात स्मार्टफोन सह इंटरनेटचा वापर गगनाला भिडला आहे. तर मोबाईल-इंटरनेट वापरकर्त्यांसोबतचं डिजिटल जाहिराती देखील वाढल्या. वर्षाला अब्जांचा खर्च या जाहिरातींवर होतो तरी पुढील पाच वर्षात डिजिटल जाहिरातींवर $21 अब्जांपर्यत खर्च होणार असल्याचं एका अहवालातून पुढे आलं आहे.