५ जी नेटवर्क अपडेट करतांना अशी घ्या काळजी
मुंबई चौफेर टेक I ३० नोव्हेंबर २०२२ I भारतात 5G नेटवर्क (5G Network) कधी येणार याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते. अखेर 1 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी )यांच्या हस्ते भारतात 5G सेवेचं उद्घाटन करण्यात आलं आहे.
पण हे नेटवर्क अपडेट करणं तुम्हाला महागात पडू शकते. सध्या देशातील महत्वाच्या 8 ते 10 शहरांमध्ये ही सेवा सुरू झाली आहे. त्यामुळं अनेकजण 5G नेटवर्क अपडेट करण्याच्या प्रयत्नात आहेत. पण हे नेटवर्क अपडेट करताना हॅकर्स याचा फायदा घेऊ शकतात. त्यामुळं 5G नेटवर्क अपडेट करताना योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक आहे.
सध्या 5G नेटवर्क अपडेट करताना अनेकांच्या बॅंकेतील पैसे उडाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. वापरकर्त्यांच्या मोबाईलवर 5G अपडेटचा मेसेज येत आहे. या मेसेजमध्ये ओटीपी मागितला जात आहे. हा ओटीपी दिला की खात्यामधील पैसे गायब होत आहेत.
यानंतर आता बॅंका ग्राहकांना अलर्ट करीत आहेत. बॅंक ऑफ महाराष्ट्राने (Bank Of Maharashtra) सुद्धा ट्वीट करत सांगितलं आहे की, कोणत्याही व्यक्तीला ओटीपी तसेच बॅंक खात्याची माहिती, आधार कार्ड, पॅन कार्डची माहिती देऊ नका.