एकदा चार्ज केल्यानंतर ८०० किमी धावेल कार
मुंबई चौफेर टेक ।३१ डिसेंबर २०२२ ।अमेरिकेच्या ल्युसिड ग्रुपने सर्वात शक्तिशाली बॅटरीची इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. तिचे नाव ल्युसिड एयर आहे. ही कार एकदा चार्ज केल्यानंतर ८३६ किलोमीटरपर्यंत धावते. याला एकदा पूर्ण चार्ज करण्यासाठी ४० ते ५० मिनिटे लागतात. कार १२०० हॉर्सपावरची आहे. ती २ सेकंदांत ९० किमीचा वेग धारण धारण करते.