जगप्रसिध्द अमेरीकन युट्युबर मिस्टर बीस्टला व्हायचयं ट्विटरचा सीईओ

मुंबई चौफेर टेक I २८ डिसेंबर २०२२ Iएलॉन मस्क यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला एक पोल ट्विट केलं होत ज्यात त्यांनी विचारल की मी ट्विटरचं प्रमुख पद सोडून द्यावं का? या पोलनुसार ट्विटरचे वापरकर्ते जे काही उत्तर देतील ते मला मान्य असेल.

मस्क यांच्या या ट्विट नंतर सोशल मिडीयावर खळबळ माजली असुन लोक उत्सफूर्तपणे पोलला उत्तर देत आपली प्रतिक्रीया कळवत आहेत. तरी या पोलचा रिसल्ट आल्यानंतर आणि हा रिसल्ट एलॉन मस्क यांच्या विरुध्द आल्यास या जबाबदारीसाठी नवा उमेदवार मिळताचं मस्क हे पद सोडतील असं एलॉन मस्क म्हणाले होते. तरी मस्क यांच्या या ट्विटनंतर जगप्रसिध्द अमेरीकन युट्युबर मिस्टर बीस्टने मस्क यांना थेट सवाल विचारला आहे की मी तुमच्या नंतर ट्विटरचा सिईओ होवू शकतो का? तरी मिस्टर बीस्टने मस्कला विचारलेला हा सवाल सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरला आहे.