डिसेंबर महिन्यात बाजारात येणार या नवीन कार !
मुंबई चौफेर टेक I २ डिसेंबर २०२२ I 2022 हे वर्ष संपत आलं आहे आणि काही वाहन निर्माते त्यांची नवीन वाहनं लवकरच सादर करणार आहेत. या पैकी बहुतेक बीएमडब्ल्यू, मर्सिडीज-बेंझ, टोयोटा आणि मारुती सुझुकीच्या एसयूव्हीचा समावेश आहे.
डिसेंबरमध्ये मार्केटमध्ये लाँच होणाऱ्या नवीन गाड्यांवर एक नजर टाकूया. मर्सिडीज GLB मर्सिडीज 2 डिसेंबर रोजी भारतात GLB SUV लाँच करणार आहे. मेक्सिकोहून सीबीयू म्हणून येण्यासाठी ही कार सज्ज झाली आहे. जीएलएसनंतर जीएलबी ही भारतातील दुसरी 7-सीटर मर्सिडीज असेल.
तिचं इंटिरिअर जीएलएने प्रेरित आहे. जीएलबीमध्ये ड्युएल 10.25 इन्फोटेनमेंट लेआउट, पॅनोरॅमिक सनरूफ, दुसऱ्या रांगेत स्लायडिंग सीट्स आणि व्हॉइस कमांड यांसारख्या सुविधा मिळतील. जीएलबी भारतात तीन व्हेरियंटमध्ये येईल. एंट्री-लेव्हल GLB 200, मिड-स्पेक GLB 220d आणि टॉप-ऑफ-द-लाइन GLB 220d 4Matic.
GLB 200 पेट्रोल 163hp साठी 1.3-लिटर टर्बो पेट्रोल इंजिनसह येईल. यात सात-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असेल. तर GLB 220d ला 2.0-लिटर मधून 190hp पॉवर मिळते जी आठ-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसाठी असतं.