गुगलवर 2022 मध्ये ‘ही’ नोकरी सर्वाधिक केली गेली सर्च
मुंबई चौफेर टेक I ८ डिसेंबर २०२२ I आज गुगलशिवाय जीवनाची कल्पना करणे कठीण आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत आपण किती गोष्टी शोधतो माहीत नाही. या शोधाच्या आधारे गुगल दरवर्षी यादी (Google Search 2022) प्रसिद्ध करते.
2022 ची यादीही समोर आली आहे. त्यानुसार, तरुणांनी अग्निपथ योजना (Agnipath Scheme) सर्वाधिक सर्च केली आहे. ही योजना नोकरी विभागात सर्वाधिक शोधला जाणारा विषय ठरला.
यानंतर NATO दुसऱ्या क्रमांकावर, NFT तिसऱ्या क्रमांकावर आणि PFI चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर पाचव्या क्रमांकावर 4 चे वर्गमूळ आणि सहाव्या क्रमांकावर सरोगसी, सातव्या क्रमांकावर सूर्यग्रहण हे विषय सर्च केले गेले. याशिवाय कलम 370 आठव्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर या श्रेणीत आणखी दोन योजना ठेवण्यात आल्या आहेत.
याशिवाय सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या व्यक्तींच्या यादीत भाजप नेत्या नुपूर शर्मा पहिल्या स्थानावर आहेत. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दुसऱ्या स्थानावर आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक तिसऱ्या क्रमांकावर होते. चौथ्या क्रमांकावर ललित मोदी आणि पाचव्या क्रमांकावर सुष्मिता सेनचा समावेश होता. याशिवाय सहाव्या क्रमांकावर अंजली अरोरा, सातव्या क्रमांकावर अब्दू रोझिक आहे. याशिवाय आठव्या क्रमांकावर एकनाथ शिंदे, नवव्या क्रमांकावर प्रवीण तांबे आणि दहाव्या क्रमांकावर अंबर हर्ड आहेत.