गुगलच्या हजारो कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार ?
मुंबई चौफेर टेक I 30 डिसेंबर २०२२ I अमेरिकेमध्ये आर्थिक मंदीच्या संकटाची चाहूल लागल्यामुळे अनेक लहान-मोठ्या कंपन्यांनी कर्माचारी कपात सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये फेसबुक, मेटा, अॅमेझॉन आणि ट्विटरसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे.
एकूणच काय तर टेक्नॉलॉजी सेक्टरमधील कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा धडाका सुरू केलेला आहे. लवकरच यामध्ये ‘टेक जायंट’ गुगलचाही समावेश होणार आहे. कंपनीनं तयार केलेली नवीन रिव्ह्यू सिस्टीम यासाठी कारणीभूत ठरणार आहे. कंपनीच्या रिव्ह्यू सिस्टीममुळे सुमारे 10 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ‘टीव्ही 9 भारतवर्ष’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
गुगलची नवीन Review System (Google Careers)
गुगलनं या वर्षी एक नवीन परफॉर्मन्स रिव्ह्यू सिस्टीम सुरू केली आहे. कर्मचाऱ्यांच्या कामगिरीच्या कॅल्क्युलेशनसाठी सुरू करण्यात आलेल्या या सिस्टीमला ‘ग्रेड’ (Google Reviews and Development) असं नाव देण्यात आलं आहे. या प्रणालीतील इअर-एंड डेडलाईनशी संबंधित प्रक्रियात्मक आणि तांत्रिक समस्यांबद्दल कंपनीचे कर्मचारी तक्रार करत आहेत.
कंपनीच्या कर्मचार्यांचं म्हणणं आहे की, या नवीन रँकिंग सिस्टममुळे कंपनीतील सुमारे सहा टक्के पूर्णवेळ कर्मचारी लो-रँकिंग कॅटेगरीमध्ये येतील. पूर्वी केवळ दोन टक्के (Google Careers) कर्मचारी या कॅटेगरीमध्ये येत होते. या शिवाय, नवीन रिव्ह्यू सिस्टीममध्ये चांगले गुण मिळवणं कठीण आहे. या सिस्टीममध्ये केवळ 22 टक्के कर्मचाऱ्यांना हाय रँकिंग मिळतील, असा अंदाज आहे. पूर्वी अशा कर्मचाऱ्यांची संख्या 27 टक्के होती.
कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात
गुगल ही जगातील सर्वांत मोठी सर्च इंजिन कंपनी आहे. सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात टेक जायंट ‘गुगल’ अतिशय उपयुक्त ठरत आहे. जगभरातील गुगल कार्यालयांमध्ये दीड लाखांपेक्षाही जास्त कर्मचारी काम करतात. गुगलच्या या रिव्ह्यू सिस्टीमच्या निर्णयामुळे 10 हजार (Google Careers) कर्मचार्यांवर परिणाम होणार असल्याचं माध्यमांनी म्हटलं आहे. कंपनीनं केवळ आपला खर्च कमी करण्यासाठी हे पाऊल उचललं असल्याची शक्यता आहे.