Musk यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून तिसऱ्यांदा ट्विटर डाउन

मुंबई चौफेर टेक I २९ डिसेंबर २०२२ I गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा ट्विटर डाऊन (Twitter Down) झाले. अचानक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने स्वयंचलितपणे वापरकर्त्यांना लॉग आउट केले. वापरकर्त्यांना तेथे त्रुटी संदेश दिसत होता.

ट्विटर लॉग इन करताना वापरकर्त्यांना येथे ‘काहीतरी चूक झाली, पण रागावू नका- तुमची चूक नाही. पुन्हा प्रयत्न करूया.’ अशा आशयाचा संदेश पाहायला मिळत आहे. वापरकर्ते त्यांच्या प्रोफाइलमध्ये बराच काळ प्रवेश करू शकले नाहीत. ऑक्टोबरच्या उत्तरार्धात एलोन मस्क (Elon Musk) यांनी विकत घेतल्यापासून ट्विटर बंद होण्याची ही तिसरी वेळ आहे.

Downdetector वेबसाइटनुसार, दिल्ली, नागपूर, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई आणि कोलकाता यासह अनेक शहरांमध्ये आउटेजची नोंद झाली आहे. एरर मेसेज पाहिल्यानंतर अनेक वेळा रिफ्रेश करूनही वापरकर्ते लॉग-इन किंवा लॉगआउट करू शकले नाहीत. डेस्कटॉप आणि मोबाईल वापरकर्ते दोन्ही समस्यांना तोंड देत होते. Downdetector हा एक प्लॅटफॉर्म आहे जो जगभरातील वेबसाइटचा मागोवा घेतो आणि वेबसाइट काम करत आहे की नाही याचा अंदाज देतो.