ट्विटरचे इलॉन मस्क यांचा स्वतःचा स्मार्टफोन तयार करण्याचा इशारा

मुंबई चौफेर टेक I २८ नोव्हेंबर २०२२ I Twiiter चे नवे बॉस इलॉन मस्क काहीही करू शकता. इलॉन मस्क यांनी स्मार्टफोन क्षेत्रातील अ‍ॅपल आणि गुगल या दिग्गज कंपन्यांना थेट इशारा दिला आहे.

या दोन्ही कंपन्यांनी ट्विटरवर बंदी घातल्यास, आपण स्वतःचा स्मार्टफोन तयार करू, असे मस्क यांनी म्हटले आहे. अर्थात या कंपन्यांनी आपल्या प्ले स्टोअरवरून ट्विटर अ‍ॅप बॅन केल्यास, मस्क असा निर्णय घेऊ शकतात. महत्वाचे म्हणजे, कंटेंट मॉडरेशन इश्यूच्या मुद्द्यावर Apple आणि Google अ‍ॅप स्टोरवर ट्विटर बॅन केले जाऊ शकते.यासंदर्भात एका युजरने विचारलेल्या प्रश्नला उत्तर देताना मस्क यांनी हे विधान केले आहे. जर गूगल अथवा अ‍ॅप्पलने आपल्या अ‍ॅप स्टोअरवरून ट्विटर बॅन केले, तर मस्क बाजारात नवा फोन आणणार का? असा प्रश्न या युजरने विचारला होता. यावर मस्क म्हणाले, आपण खरो खरच नवा फोन बाजारात आणू. ‘मला आशा आहे, की असे होणार नाही. मात्र, हो, जर असे झालेच, तर मी फोन तयार करेन,’ असे मस्क यांनी म्हटले आहे.