घर आणि दुकानाच्या सुरक्षेसाठी वापरा हे स्मार्ट लाॅक
मुंबई चौफेर टेक । ४ जानेवारी २०२३ ।सुरक्षेसाठी कुलूप वापरण्याची पध्दत फार प्राचीन आहे. आधीच्या काळी गड-किल्यांच्या सुरक्षेसाठी भलेमोठे कुलूप वापरण्यात येत होते, मात्र काळानुसार यात अनेक बदल होत गेले.
आधुनिक वैशिष्ट्यांसह अनेक स्मार्ट लॉक (Smart Lock) उपलब्ध आहेत. स्मार्टफोनवरून ते नियंत्रित करण्याव्यतिरिक्त, ते मॅन्युअली देखील वापरले जाऊ शकते. यामध्ये अनेक वैशिष्ट्यांचा समावेश आहे. तंत्रज्ञानाच्या युगातले हे आधुनिक स्मार्ट लाॅक तुमच्या घराला अधिक सुरक्षित करेल. चोरीपासून सामानाचे संरक्षण करण्यासोबतच चोराला पकडण्यातही मदत होते. यात चुकीची चावी घातल्यानंतर सायरन वाजतो.
हे अलार्म लॉक सामान्य लॉक म्हणून देखील वापरले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला वेगळे कोणत्याही उपकरणाची गरज भासणार नाही. स्मार्टफोनशी कनेक्ट न करता तुम्ही ते सामान्यपणे वापरू शकता. हे फिचर बंद केल्यास दुसरी चाबी टाकल्यानंतरही अलार्म वाजणार नाही. सामान्य लॉकप्रमाणे, ते घराच्या आत वापरले जाऊ शकते.
साधारणपणे, कोणत्याही गॅझेटमध्ये अलार्म सेट करण्यासाठी वेळ निश्चित केल्यानंतर, स्मार्टफोन आवश्यक आहे. ब्लूटूथशी कनेक्ट केल्याशिवाय अलार्म सेट करणे खूप कठीण आहे. तुम्ही स्मार्ट अलार्म सायरन लॉक विकत घेतल्यास, तुम्हाला त्यात वेगळ्या उपकरणाची गरज भासणार नाही.