व्हाट्सअपने केली भारतातील 23 लाख पेक्षा जास्त अकाउंटवर कारवाई

मुंबई चौफेर टेक I १ डिसेंबर २०२२ I WhatsApp ने देशातील वापरकर्त्यांवर मोठी कारवाई केली आहे, ऑक्टोंबर महिन्यात भारतातील 23 लाख पेक्षा जास्त अकाउंटवर कारवाई केली आहे. देशात नव्या आयटी नियमा आधारीत ही कारवाई करण्यात आली आहे.

1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान, 23,24,000 व्हॉट्सअॅप अकाउंट्सवर बंदी घालण्यात आली होती, आणि त्यापैकी 8,11,000 अकाउंट कायमचे बंद करण्यात आली आहेत.

WhatsApp जगभरात सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे. व्हाॉट्स अॅप नेहमी नवे बदल करत असते. गेल्या काही दिवसापूर्वी सोशल मीडियासाठी नवीन नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

तुमचे ट्विटर, फेसबुक किंवा इंस्टाग्राम खाते हॅक झाल्यास तुमच्याकडे नेहमी ते पुनर्प्राप्त करण्याचा पर्याय असतो. यासाठी तुमचा फोन नंबर आणि ईमेल आवश्यक आहे. ज्यावर तुम्हाला पासवर्ड रीसेट करण्याची लिंक किंवा कोड पाठवला जातो.

यासाठी तुम्ही Forgot Password हा पर्याय वापरू शकता. किंवा तुमच्या खात्याशी तडजोड झाल्याचे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही सेटिंग्जमध्ये जाऊन तुमचा पासवर्ड आणि गोपनीयता सुरक्षिततेचे पुनरावलोकन करू शकता.