२०२३ मध्ये व्हॉट्सअप घेवून येणार ‘हे’ नवे फिचर्स

मुंबई चौफेर टेक । ५ जानेवारी २०२३ ।२०२३ या नव्या वर्षात व्हॉट्सअप आणखी काही भन्नाट फिचर घेवून येण्याच्या तयारीत आहे. यातील कुठला फिचर कधी लॉंच होणार याबाबत अजून तरी व्हॉट्सअप कडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

1. एडिट मेसेज

WhatsApp वापरकर्ते अनेकदा मेसेज पाठवल्यानंतर तो मेसेज एडिट करु शकत नाहीत म्हणून त्यांना तो मेसेज डिलीट करावा लागतो आणि तोचं मेसेज पुन्हा एकदा नव्याने टाईप करुन पाठवावा लागतो. किंवा तो मेसेज डिलिटही केला गेला नाही तर रिसिव्हरला चुकीचा मेसेज मिळतो. त्याचं साठी एडिट हे फिचर व्हॉट्सअपमध्ये असावं असं प्रत्येक व्हॉट्सअप वापरकर्त्याला वाटत. बीटा परीक्षक सध्या एडिट ऑप्शनवर काम करत असुन लवकरचं ते फिचर व्हॉट्सअप वापरकर्त्यांना वापरता येण्याची शक्यता आहे.

2. व्हॉइस स्टेटस अपडेट

WhatsApp वरील स्टेटस अपडेट करत तुम्ही तुमचं करंट स्टेटस तुमच्या कॉन्टॅक्ट्सला दाखवू शकता. पण सध्या तर फोटो, व्हिडीओ किंवा टेक्ट हेच तुम्हा तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला शेअर करु शकता. पण आता तुमच्या आवाजातली एखादी व्हॉईस नोट किंवा एखाद गाणं अथवा एखादी ऑडिओ क्लीप देखील तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला शेअर करता येणार आहे. WABetaInfo नुसार, वापरकर्ते लवकरच तुमच्या स्टेटस अपडेटवर 30 सेकंदांपर्यंत व्हॉइस नोट पोस्ट करू शकतील अशी प्रातमिक माहिती मिळत आहे.

3. तारखेनुसार संदेश शोधा

व्हॉट्सअपवर चॅट करणं जेवढं सोपी आहे तेवढचं व्हॉट्सअप वरील जुनी चॅट शोधण कठीणं. पण आता हे काहीसं सोप होण्याची सक्यता आहे. कारण व्हॉट्सअप जुन्या चॅट संबंधी एक अपडेट घेवून येत आहे तरी या अपडेट नुसार तारखेनुसार तुम्ही तुमचे जुने मेसेज सहज शोधु शकणार आहात. लवकरच हा फिचर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर उपलब्ध होणार आहे.