एलन मस्कच् आता ब्रेनमध्ये चिप लावणार? न्युरालिंक प्रोजेक्ट काय आहे वाचा संपूर्ण माहिती
मुंबई चौफेर टेक I २ डिसेंबर २०२२ I ट्विटरची (Twitter) मालकी मिळाल्यानंतर एलन मस्क यांच्या नव-नवीन निर्णयांमुळे नेट यूझर्सना एकानंतर एक धक्के बसत आहेत.
स्पेसएक्स, टेस्ला आणि ट्विटरसारख्या कंपन्यांचे मालक एलन मस्क (Elon Musk) यांना आधीपासूनच तंत्रज्ञानात खूप रस आहे. त्यांची आणखी एक कंपनी तंत्रज्ञानावर काम करते. तिचं नाव आहे न्यूरालिंक. न्यूरल इंटरफेस टेक्नोलॉजी (Technology) विकसित करणारी ही कंपनी सध्या खूपच चर्चेत आहे.
त्याचं कारण म्हणजे कंपनीने एक खास चिप बनवली आहे. माणसाच्या मेंदूत ही चिप बसलता येते. यामुळे माणसाच्या क्षमता वाढतात.
विशेष म्हणजे एलन मस्क स्वतःच ही चिप आपल्या मेंदूत बसवून घेणार आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या या निर्णयाची तुफान चर्चा आहे.
न्यूरालिंकशी संबंधित काही व्हिडिओ समोर आले आहेत. व्हिडिओत एक माकड आपल्या मेंदूच्या मदतीने टायपिंग करते. मस्क यांची कंपनी अनेक वर्षांपासून या प्रोजक्टवर काम करते. या खास प्रोजक्टची बरीच वैशिष्ट्ये आहेत.
न्युरालिंक चिप काय आहे?
कंपनीच्या दाव्यानुसार, ही एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स पावर्ड मायक्रोचिप आहे. ती मेंदुतील क्रियांची नोंद घेते आणि त्या वाचते. याद्वारे मानवाच्या असमर्थतांवर मात करण्यास मदत मिळेल.
उदा. एखाद्या लकवा झालेला माणूस मेंदूचा वापर करून स्मार्टफोन वापरू शकेल. मेंदूद्वारे हातापेक्षा जास्त वेगाने फोन वापरू शकेल. २०१६ मध्येही मस्क यांनी यासंबंधी सूतोवाच केलं होतं. न्यूरा लिंकने एका व्हिडिओत दाखवलं होतं. एक माकड हातांचा वापर न करताच पिंगपाँग गेम खेळताना त्यात दाखवण्यात आलं होतं.
चिप काय काय करू शकते?
कंपनीच्या दाव्यानुसार, ज्या व्यक्तीच्या मेंदूत ही चिप टाकली जाईल, तो काहीही न बोलता उपकरणांना आदेश देईल. सध्या याद्वारे यूझर्स स्मार्टफोन आणि कंप्युटरसारखे बेसिक डिव्हाइस नियंत्रित करू शकते.
पुढील 6 महिन्यात मानवी मेंदूत ही न्युरालिंक इन्स्टॉल करता येईल, असे मस्क यांनी नुकतेच सांगितले. पॅरालाइज, नेत्रहीन किंवा स्मृतीभ्रंश तसेच मेंदूसंबंधी आजारांमध्ये या चिपचा वापर होईल.
मस्क यांच्या मेंदूत चिप लावणार?
खरं तर एलन मस्क यांनी स्वतःच्याच मेंदूत ही चिप लावण्याचं वक्तव्य स्पष्टपणे केलेलं नाही. पण स्वतःचा इंटरेस्ट दाखवला आहे. Ashlee Vance यांच्या ट्विटला रिप्लाय करताना त्यांनी ही माहिती दिली.